शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाचीही शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. तर दुसरीकडे राजकीय आकसाने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आमदारांचे संरक्षण काढून घेतले असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मात्र हे आरोप गृहखात्याकडून फेटाळण्यात आले आहेत.
#TanajiSawant #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #Pune #Shivsainik #SanjayRaut #DilipWalsePatil #PunePolice #ShindeVsSena #Maharashtra